Marathi Vidnyan Parishad – 48th Science Convention

Watch the full video proceedings of the 48th Marathi Science Convention held at Lonavla on 7-8 December, 2013.

लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राच्या विस्तीर्ण जागेत ७ डिसेंबर २०१३ ला सकाळी १० वाजता ४८व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन सुरु झाले. महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून सुमारे तीनशे विज्ञान प्रसारक प्रतिनिधी अधिवेशनासाठी जमले होते. “सर्जनशिलतेकडून संशोधनाकडे” या विषयाभोवती गुंफलेल्या या अधिवेशनात भारतात गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानापासून आजच्या आणि उद्याच्या अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत सुसंगत असलेल्या संशोधनाच्या दिशांचा मागोवा घेतला गेला.

वैज्ञानिक संशोधनास चालना देणे, दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर करत विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढविणे, विज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण, ऊर्जा, आरोग्य, महिला सक्षमीकरण करत विकास करणे आदी विषयांवर विस्तृत चर्चा झाली. सगुणा बागचे, शेखर भडसावळे, डॉ. सतीश देसाई, “आरतीचे’चे आनंद कर्वे, मिटकॉनचे विजयकुमार चोले आदींनी चर्चासत्रांमध्ये त्यांचे विचार मांडले.

Watch all the videos here!

This entry was posted in conference, science and tagged . Bookmark the permalink.

Comments are closed.